अमळनेर शहरात आगीत 40 हजारांची रोकड खाक


अमळनेर (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : अमळनेर शहरातील देशमुख गल्ली भागातील घरात विजेचा बल्ब फुटल्याने लागलेल्या आगीत कपाटात ठेवलेली 40 हजारांची रोकड जळून खाक झाली. ही घटना शुक्रवार, 20 रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

दागिने जळाले, रोकड खाक
अमळनेरच्या सराफ बाजार भागात डॉ.प्रिया मनोज जैन (22) वास्तव्यास आहे. शुक्रवारी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास स्वयंपाक घरातील खोलीचा बल्ब फुटल्याने त्यातील आगीच्या ठिणग्या प्लास्टीक ठेवलेल्या वस्तूंवर पडल्याने आग लागली. आगीचा वणवा स्वयंपाक घरातील कपाटाला बसल्याने त्यात ठेवलेली 40 हजारांची रोकड खाक झाली तर सोन्याचे दागिने जळाल्याने वितळून नुकसान झाले. या प्रकरणी डॉ.जैन यांच्या फिर्यादीवरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास हवालदार प्रमोद पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !