चाळीसगावात शिवनेरी हॉटेल फोडले : 27 हजारांची रोकड लंपास
चाळीसगाव (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : चाळीसगाव शहरातील घाट रोड भागातील हॉटेल शिवनेरीचे शटर तोडून चोरट्याने ड्रॉवरमधून तब्बल 27 हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीची घटना 19 ते 20 दरम्यान घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीने व्यावसायीक धास्तावले
शहरातील घाट रोड भागात चेतन दत्तात्रय चौधरी यांचे हॉटेल शिवनेरी आहे. नेहमीप्रमाणे गुरुवार, 19 रोजी रात्री मालकाने हॉटेल बंद करून घर गाठल्यानंतर चोरट्यांनी रात्री अडीचनंतर संधी साधली. दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंगात जॅकेट व तोंडाला रूमाल बांधलेला चोरटा कैद झाला आहे. दुसर्या दिवशी सकाळी चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नितीन आगोणे करीत आहेत.
