आजाराला कंटाळून जळगावच्या प्रौढाची शेळगाव बॅरेजच्या पाण्यात उडी


यावल (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) :  यावल तालुक्यातील टाकरखेडा येथून जवळच तापी नदीच्या पुलावर उभारण्यात आलेल्या शेळगाव बॅरेज येथील पुलावर दुचाकी लावून जळगावातील 53 वर्षीय प्रौढाने पाण्यात उडी घेतली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्याची दुचाकी तसेच त्यांनी लिहिलेले पत्र हस्तगत केले. राजू शिवाजी नेरकर (53) हे जळगाव शहरातील रहिवासी असुन पाण्यात बुडून तो बेपत्ता झाला आहे व त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

बेपत्ता इसमाचा शोध
टाकरखेडा, ता.यावल येथून जवळच तापी नदीच्या पुलावर शेळगाव बॅरेजच्या पुलावर मंगळवारी सकाळी राजू शिवाजी नेरकर (53, सरदार वल्लभभाई पटेल नगर, औद्योगिक वसाहत, जळगाव) हे दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 ई. आर. 9484) घेऊन आले व त्यांनी पुलावर त्याची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी लावली आणि खिशातून काही कागदपत्र, आधार कार्ड व चिठ्ठी असे दुचाकीवर ठेवले आणि त्याने पाण्यात उडी घेतली. हा प्रकार तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तातडीने यावल पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घेतली धाव
घटनास्थळी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन, सागर कोळी, महेंद्र माळी, ललित इंगळे आदी पथकासह दाखल झाले. आपण आजाराला कंटाळून जीव देत असल्याची चिठ्ठी आढळली असून त्यात आपला मृतदेह काढून कुटुंबाला सोपवण्यात यावा, याकरिता कोणाशी संपर्क साधावे त्याचा मोबाईल क्रमांक देखील त्यांनी लिहून ठेवले होते. दरम्यान, त्याच्या नातलगांना व कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून बेपत्ता इसमाचा शोध सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !