भुसावळातील व्यापार्याची पाच लाखांची रोकड लूटली : अनोळखी चौकडीविरोधात गुन्हा
मुक्ताईनगर (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : दुचाकीवरून घराकडे निघालेल्या भुसावळातील व्यापार्याला कट मारून खाली पाडत त्याच्याकडील पाच लाखांची रोकड घेवून चौकडी कारद्वारे पसार झाली. एखाद्या सिनेमाच्या कथानकाला साजेशी घटना मुक्ताईनगर-घोडसगाव रस्त्यावरील हॉटेल विश्रांतीसमोर घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात बोदवड तालुक्यातील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे लूट प्रकरण
यश लक्ष्मीकांत जोशी (23, तु.स.झोपे शाळेजवळ, भुसावळ) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 21 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ते दुचाकीने भुसावळकडे येत असताना मुक्ताईनगर-घोडसगाव रस्त्यावरील हॉटेल विश्रांतीसमोर इनोव्हामधून आलेल्या संशयीताने कट मारला व जोशी हे जमिनीवर पडले. त्याचवेळी कारमधून चार अनोळखी संशयीत उतरले व त्यांनी व्यापार्याकडील पाच लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला. व्यापार्याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ करीत आहेत.
