अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा


संविधान बचाव नागरी कृती समिती तर्फे पोलीस अधीक्षकांकडे मागणी

जळगाव : शहरातील तांबापुरा भागातील अल्पवयीन मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी मेहरून तलाव येथे संशयास्पदरीत्या मिळून आल्याने या प्रकरणाची चौकशी कून दोषी आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच जळगावात मागील तीन-चार दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटना अल्पवयीन मुलीसोबत घडल्याने या प्रकरणात सुद्धा पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना संविधान बचाव कृती समितीतर्फे करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक, मौलाना आझाद विचार मंचचे अब्दुल करीम सालार, आंबेडकरवादी समितीचे मुकुंद सपकाळे, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे व मणियार बिरदारीचे प्रदेश अध्यक्ष फारूक शेख यांची उपस्थिती होती. पोलिस अधीक्षकांनी संबंधित तपासणी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले व लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करून आरोपीवर कठोर कारवाई होईल या अनुषंगाने दोषारोपपत्र तयार करण्याचे आदेश दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !