भुसावळातील शिवाजी नगरात कोरोना तपासणी शिबिर


भुसावळ : शहरातील शिवाजी नगरातील डी.एल.हिंदी हायस्कुलमध्ये सोमवारी कोविड 19 अंतर्गत रुग्ण तपासणी व स्वॅब नमुने संकलन शिबिराचे आयोजन उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे व उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबिरात 43 रुग्णांचे स्वॅबचे नमुने संकलित करण्यात आले. याकामी नोडल अधिकारी म्हणून अ‍ॅड.तृप्ती भामरे यांनी यशस्वी नियोजन केले. नगरपरीषद रूग्णालयाच्या महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.तौसीफ खान, प्रयोगशाळा तंत्रज्ञ लोखंडे, भानुदास चौधरी, प्रशांत चौधरी, परीचारीका सोनल जोगी यांचे सहकार्य लाभले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !