यावलमधील विश्रामगृह ठरतेय आंबट शौकीनांचा अड्डा


वॉचमन नसल्याची टवाळखोरांना आयतीच संधी : शासकीय मालमत्तेचेही केले नुकसान : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने संताप

यावल : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शासकीय विश्रामगृह आंबट शौकीनांचा अड्डा ठरू पाहत आहे. एकांतवासाचे ठिकाण असलेल्या विश्रामगृहाच्या ठिछकाणी देखरेखीसाठी वॉचमन नसल्याकारणाची संधी टवाळखोरांना चालून आली आहे. या ठिकाणी काही अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देवून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टवाळखोरांकडून मालमत्तेचे नुकसान
यावल शहर हे तालुक्याचे एक प्रमुख शहर आहे. शहरातील उतरेकडे बंद पडलेली जे.टी.महाजन सूतगिरणी असून त्यायबरोबर याच वरीसरात शाळा विद्यालय व शासकीय आयटीआय आहेत. ही वर्दळीची केंद्र गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने संपूर्ण परीसर निर्मनुष्य बनल्याने काही आंबटशौकीन तरुण-तरुणी याच ठिकाणी बंद पडलेल्या यावल सार्वजनीक बांधकामच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शासकीय विश्रामगृहाचा दुरुपयोग करीत असल्याची चर्चा आहे. विश्रामगृह परीसरातील शासकीय मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर नासधूसदेखील करण्यात आली आहे.

तळीरामांचा वाढला वावर
शासकीय विश्रामगृहावर वॉचमन नसल्याकारणाने सायंकाळच्या वेळीस तळीरामांना देखील चांगलेच फावले आहे. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिथी गणांसाठी शासकीय विश्रामगृह आहेत मात्र यावल शहरातील विश्रामगृहासारखी दुरस्था कुठल्याही विश्रामगृहाची नाही, असे एकूण चित्र आहे.3 शासकीय विश्रामगृहाची ही अवस्था गेल्या दोन वर्षांपासून झाली आहे. यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रश्नाकडे गांर्थीयाने लक्ष देत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा कारभारामुळे नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सा.बां.विभागाने तत्काळ या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास काही अप्रीय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !