यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीवर प्रशासकाची होणार नियुक्ती


यावल : तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाची मुदतही सप्टेंबर व डिसेंबर 2020 मध्ये संपत असून कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय या दृष्टीकोणातून या निवडणुका होणार नसल्याने आणि राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या काढलेल्या नवीन आदेशान्वये या ग्रामपंचायतीवर पुढील निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर होईपर्यंत गावातील मतदारांमधूनच योग्य प्रशासकाची निवड करण्याचे ठरले आहे.

उच्च शिक्षीत युवकांचे निवडीकडे लागले लक्ष
प्रशासक पदासाठी गावातील ग्रामपंचायतींवर कोणाची निवड होते याकडे ग्रामस्थांचे व विशेष करून उच्च शिक्षीत युवकांचे लक्ष या नियुक्तीकडे लागुन आहे. तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2020 मध्ये मुदती संपणार्‍या ग्रामपंचायतींमध्ये मनवेल, महेलखेडी, हिंगोणे, डोंगरकठोरे, सांगवी बुद्रुक, मोहराळे, अट्रावल, निमगाव, सावखेडासीम, वढेोदे प्र. सावदा, अंजाळे, दुसखेडा, सांगवी खुर्द, उंटावद, पिंपरुड, कोळवद, कोसगाव, नावरे, बोरखेडा बुद्रुक, आडगाव, डोणगाव, सातोद, हंबर्डी, बामनोद, कोरपावली, विरोदा, चिोंली, मारुळ, वढोदे प्र. यावल, दहीगाव, टाकरखेडा, नायगाव, शिरसाड, भालोद, भालशिव, पिंप्री, बोरावल बुद्रुक या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपणा-या ग्रामपंचायतीत डांभूर्णी, आमोदा, बोरावल खुर्द, वनोली, विरावली, वड्री खुर्द, किनगाव बु.॥, कासवे, पिळोदे खुर्द, राजोरा या ग्रामपंचायतींचा समावे आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदावर आरक्षण निहाय प्रशासकाची नियुक्ती होणार असल्याचे वृत प्राप्त आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !