शेतकर्‍यांना दिलासा : मोर प्रकल्पात 63.26 टक्के साठा


यावल : तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याच्या कुशीत असलेले व शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेला मोर मध्यम प्रकल्प यंदा दमदार पावसामुळे पहिल्यादांच जुन आणि जुलैच्या पावसात 63.26 टक्क्यांवर भरला आहे. या प्रकल्पाच्या चारगेट पैकी दोन गेट तीन दिवसांपासुन पाच सेंटीमीटरने उघडण्यात आल्याने मोर नदीपात्रात दररोज 5.97 क्यूमेक्स पाण्याच्या विसर्ग झाला. या विर्सगामुळे शेतशिवारात विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, प्रकल्पात पाण्याची आवक कमी झाल्याने शनिवारी पहाटे दरवाजे बंद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतशिवारातील विहिरींची जलपातळी वाढली
यावल तालुक्यातील हिंगोणा गावाच्या पुढे उत्तर दिशेला सातपुड्याच्या कुशीत मोर मध्यम आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता 9.505 दलघमी इतकी आहे. या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र हे सातपुड्यातील असून सध्या सातपुड्याच्या कुशीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. परीणामी या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे. यंदा प्रथमच जुन महिन्यात हा प्रकल्प 63.26 टक्के भरला आहे. सध्या 6.581 दलघमी जलसाठा धरणात झाला आहे. प्रकल्पातील पाणी फैजपूर, आमोदा, अंजाळेकडून तापी नदी पात्रात येत असून परीसरातील शेत विहिरींच्या जलपातळीत वाढ होत आहे. या मध्यम प्रकल्पाला एक उजव्या कालवा असून या कालव्यास हिंगोणा मायनर 1 व 2 अशा वितरीका असून उपवितरीका देखील आहे. या जल प्रकल्पात अजुन साठा वाढल्यास प्रसंगी कालव्यातून देखील विसर्ग करण्यात येईल, अशी माहिती मोर मध्यम प्रकल्पाच्या सूत्रांन दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !