पथसंचलनातून कोरोनाबाबत यावल तालुक्यात जनजागृती


यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांचा अनोखा उपक्रम

यावल : राज्यात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणु संसर्गाने गेल्या काही दिवसांपासून यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्राला आपल लक्ष केले आहे. या भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अत्यंत वेगाने वाढत असून या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या महामारी संकटसमयी आपला जीव धोक्यात घालुन अहोरात्र यावलकरांसाठी धावणारे कार्यतत्पर अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण करणार्‍या पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी पुन्हा कोरोना जनजागृती करण्यासाठी सर्वाधिक प्रभावीत गावे असलेल्या साकळी गावासह किनगाव, कोरपावली, दहिगाव या गावात तालुक्यातील पोलिस पाटील व आपल्या पोलिस कर्मचार्‍यांसोबत पथसंचलन केले शिवाय यावेळी फलकांद्वारे कोरोना संसर्गाविषयाची जनजागृती करण्यात आली.

नागरीकांच्या सहकार्याची गरज
पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी या कोरोनाविरूद्ध जनजागृती मोहिम नागरीकांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणार नसल्याचे सांगुन कोरोनाच्या विरूद्धच्या लढ्यात नागरीकांनी एकजुटीने, एक मनाने व एकसंघाने शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करूनच आपण हा जागतीक पातळीवरील महामारी विरूद्धचा लढा जिंकण्यात यशस्वी होवू, असा विश्वास व्यक्त केला. जनजागृती प्रभात फेरीत यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, उपनिरीक्षक जितेंद्र खेरणार, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले सह पोलिस सहकारी आणि गृहरक्षक दलातील शिपाई सहभागी झाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !