कोरोना चाचणीच्या अहवालापूर्वी पाचोर्‍यात तरुणाची आत्महत्या


कॉरंटाईन सेंटरमधील घटनेमुळे खळबळ : अधिकार्‍यांची भेट

पाचोरा : कॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या 33 वर्षीय तरुणाने कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच मृत्यूला कवटाळले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. बांबरूड राणीचे येथील हा तरुण असल्याचे सांगण्यात आले. रविवार, 19 जुलै रोजी पाचोरा तालुक्यातील बांबरूड (राणीचे) येथील 33 वर्षीय युवकाला शहरातील कॉरंटाईन क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते शिवाय त्याचा स्वॅबही घेण्यात आला मात्र मात्र अहवाल येण्यापुर्वीच त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देत चौकशी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !