कोरपावलीत वयोवृद्ध शेतकर्याची आजाराला कंटाळून आत्महत्या
यावल : तालुक्यातील कोरपावली येथे एका वयोवृद्ध शेतकर्याने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घनश्याम राजाराम महाजन (73, कोरपावली) असे मयत वृद्धाचे नाव आहे. महाजन यांना पाठदुखी व कंबरदुखीचा आजार असल्याने ते त्रस्त होते. मंगळवारीदेखील वेदना असह्य झाल्याने पत्नी उषाबाई महाजन यांनी त्यांना दवाखान्यात जावू, असे सांगितले होते मात्र तत्पूर्वीच त्यांनी गुरांच्या पत्री गोठ्यात असलेल्या छताच्या अँगलला दोरीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. ही उघडकीस येताच त्यांना नागरीकांनी यावल ग्रामीण रुग्णालयात हलवले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत मयताचा पुतण्या रोहीदास यशवंत महाजन यांनी पोलिसात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी असलम खान हे करीत आहेत.

