भुसावळातील रीदम रुग्णालयातर्फे पोलिसांची आरोग्य तपासणी
भुसावळ : लॉकडाउन काळात व कोरोना संकटात अविट कर्तव्यपूर्तता करणार्या पोलिस कर्मचार्यांची मोफत आरोग्य तपासणी श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केली जात आहे. रविवारी भुसावळसह सावदा येथील पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि भुसावळ कारागृहाचे अधिकारी व कर्मचार्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. रविवारी भुसावळ येथील कारागृहाचे माधव खैरागे व कारागृहाचे कर्मचारी, बाजारपेठ पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे, तालुका पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी तसेच सावदा पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात प्राथमिक तपासणीसह रक्तदाब, इसीजी, रक्तातील साखर, नेत्र तपासणी समावेश होता. या प्रसंगी रुग्णालयाचे संचालक डॉ.नितीन पाटील, डॉ.महेश पांगळे, डॉ.कुशल पाटील यांनी या उपक्रमांतर्गत तपासणी केली.

