केर्‍हाळेनजीक अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले


अवैध वाळू वाहतूकदारांविरुद्ध महसूल पथकाची धडक कारवाई

रावेर : रावेर महसूल पथकाने अवैध वाळुने भरलेले दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली पकडल्याने अवैध वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. केर्‍हाळानजीक अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकला मिळताच गुरूवारी सकाळी सहाच्या सुमारास तहसीलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर मंडळ अधिकारी विठोबा पाटील, यासीन तडवी, तलाठी शैलेश झोटे या महसूल पथकाने धडक करवाई करत ट्रॅक्टर (एम.एच.27 एल.2563) हे ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली तसेच 14 रोजी सायंकाळी सुध्दा विना नंबरचे अवैध वाळुने भरलेले दोन ट्रॅक्टर-ट्रॉली मंडळ अधिकारी तडवी यांनी पकडत निंभोरा पोलिस ठाण्यात ते जमा करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !