श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाची ऑनलाईन सभा
भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाची सभा ऑनलाईन सभा मार्गदर्शक जी.आर.ठाकूर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सुमारे आठ महिन्यानंतर एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग न आलेल्या सदस्यांना ऑनलाईन एकमेकांना भेटता आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी काही सदस्यांनी गीते सादर केली. आप्पासाहेब सोनवणे, सचिव रागिणी पुराणिक, शालिनी महाजन, लता बेंडाळे, अलका अहिरराव, आर.एल.पाटील, अंभईकर, प्रकाश विसपुते, विनायक पाचपांडे, विलास बेंद्रे, कुरंभट्टी, एस.डी.जाधव, डॉ.रवींद्र शुक्ला सहभागी झाले.

