वांजोळ्यातील बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमांना द्यावी फाशी
सखी श्रावणी महिला संस्थेतर्फे प्रांताधिकार्यांना निवेदन
भुसावळ : तालुक्यातील वांजोळा गावातील नवीन भिल्ल वस्ती परीसरातील साडेसहा वर्षी मुकबधीर अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवार, 14 रोजी दुपारी सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी मंगल सीताराम भील (35) यास अटक करण्यात आली आहे. या घटनेचा भुसावळातील सखी श्रावणी महिला संस्थेतर्फे निषेध करण्यात आला असून प्रांताधिकार्यांना निवेदन देत आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा खटला
या निवेदनाचा आशय असा की, आरोपी आरोपी मंगल सीताराम भील (35) याचे विरुद्ध तत्काळ कठोर कारवाई करावी शिवाय या खटल चालवण्यासाठी सरकारी वकील म्हणून अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना संस्थाध्यक्षा राजश्री नेवे, माया चौधरी, उज्ज्वला बागुल, वंदना झांबरे, अनुराधा टाक, स्मिता माहुरकर, दिलीप टाक, भाग्यश्री नेवे, मंदाकिनी केदारे, राजश्री बादशहा, महानंदा पाटील, प्रतिभा विसपुते, संगीता लुल्ला, रोहित महाले, अजय चौधरी, मयुर सावकारे उपस्थित होते.


