यावलमध्ये विना परवाना वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त
यावल : विस्तारीत वसाहतीच्या क्षेत्रातील आयशानगर या भागात मध्यरात्री रात्री पोलिसांनी विनापरवाना वाळुची वाहतुक करणार्या एका डंपरला जप्त केले करीत वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. शुक्रवारी रात्री 12.30 वाजेच्या वेळीस यावल शहरातील आयशानगर परीसरात वाहन क्रमांक (एम.एच 19, सी.वाय 4861) या चारचाकी टाटा डंपरवरील चालक संतोष रतीलाल कोळी (31, रा.विदगाव) हा त्याच्याकडील वाहनातुन बेकायदेशीर विनापरवाना वाळुची वाहतूक करताना गस्तीवर असलेले पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांच्यासह सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठाण, पोलिस कर्मचारी राहुल रत्नाकर चौधरी, पोलिस कर्मचारी असलम खान दिलावर खान, सतीष भोई यांच्या पथकाला आढळला. संबंधिताला वाळू परवान्याबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचे वाहनचालकाने सांगीतले. त्यावरून यावल पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला व पोलिस कर्मचारी राहुल रत्नाकर चौधरी यांनी फिर्याद दिल्यावरून डंपर चालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

