भुसावळ तालुक्यात तीन कापूस हमी भाव केंद्र सुरू करा
भुसावळ कृउबा सभापती सचिन चौधरी यांची पणन मंत्री व सचिवांकडे मागणी
भुसावळ : कापूस खरेदी केंद्रावर होणारी शेतकर्यांची गर्दी व मागील वर्षांचा अनुभव पाहता भुसावळ तालुक्यात किमान तीन कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी भुसावळ कृउबाचे सभापती सचिन संतोष चौधरी यांनी राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील तसेच मुख्य पणन सचिव अनुप कुमार यांच्याकडे केली. मंत्रालयात गुरुवारी चौधरी यांनी उभयंतांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. चौधरी यांनी उभयंतांशी चर्चा करताना भुसावळ बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच भाजीपाल्याचे लिलाव सुरू झाल्याची माहिती दिली तसेच प्रस्तावीत कामांची माहिती दिली. केंद्र सरकारने 5 जून 2020 रोजी पारीत केलेला कृषी अध्यादेश हा खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देवून असल्याने व शेतकर्यांसाठी मारक असल्याने राज्यात त्याची अंमलबजावणी न करण्याची मागणी केली. जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा जिव्हाळ्याचा असलेल्या केळी फळ पीक विमा योजनेतील समस्याही सोडवण्याची मागणी करण्यात आली.

