भुसावळात उधारीच्या वादातून मारहाण : आठ जणांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : उधार पैसे न दिल्याच्या वादानंतर एकाला मारहाण करण्यात आल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास सागर अशोककुमार रोहेडा (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) हा व त्याचे मित्र रस्त्याने येत असतांना महामार्गावरील गणेश बोरींगजवळ मोनू उर्फ अश्विन सोनवणे (रा. हुडको कॉलनी, भुसावळ) याने अडवत गतवर्षी एक हजार रूपये उसनवार मागितले होते, ते का दिले नाही, असे म्हणत मोनू त्याच्या सोबतच्या आठ जणांनी सागर व त्यांच्या सोबत रामचंद्र डीग्रीया, दिनेश डीग्रीया, पवन डीग्रीया, प्रेम डीग्रीया, साहिल डीग्रीया आदी मित्रांना मारहाण केली. याप्रकरणी सागर यांच्या फिर्यादीवरून मोनू सह आठ जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमण सुरळकर पुढील तपास करीत आहे.

