भुसावळात गृहमंत्र्यांचे राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी केले स्वागत
भुसावळ : बोरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघा भावंडाच्या हत्येच्या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबाची भेट घेण्यासाठी शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख हे रावेर येथे जात असताना भुसावळात दुपारी तीन वाजता त्यांच्या ताफ्याचे आगमन झाल्याने भुसावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी त्यांचे यावल रस्त्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ स्वागत केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी आमदार संतोष चौधरी यांचे पूत्र तथा कृउबा समिती सभापती सचिन चौधरी व अन्य पदाधिकार्यांचे गृहमंत्र्यांचे बुके देवून स्वागत केले. याप्रसंगी देशमुख यांनी माजी आमदार चौधरी यांच्याबाबत विचारणा केल्यानंतर ते कोरोना पॉझीटीव्ह आल्यानंतर आता तब्येत्तीत सुधारणा झाली असून ते मुंबईत असल्याची माहिती सचिन चौधरी यांनी दिली. याप्रसंगी उपस्थित नगरसेवकांचा परीचय करून देण्यात आला. यावेळी कृउबा समिती सभापती सचिन चौधरी, शहराध्यक्ष नितीन धांडे, उप गटनेते शेख जाकीर, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, ललित मराठे, कम्मा पहेलवान, राहुल बोरसे, निखील भालेराव, काँग्रेसचे रवींद्र निकम व पदाधिकारी उपस्थित होते.

वाहतूक ठप्प
गृहमंत्र्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर यावल रस्त्यापासून वाय पॉईंटपर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता शिवाय ताफा येण्यापूर्वी वाहतूक थांबवून ठेवण्यात आली. शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्यांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले.

