बोरखेडा हत्याकांड : चारही भावंडांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार


रावेर : बोरखेडा येथील भिलाला कुटुंबातील चार भावंडांची कुर्‍हाडीने हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. शवविच्छेदनानंतर चारही भावंडांवर रावेर येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी (अंत्यसंस्कार) करण्यात आला. याप्रसंगी मयत भिलाला कुटुंबासह आप्तेष्टांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

एकाच कुटुंबातील चौघा भावंडांची हत्या
रावेर-बोरखेडा रस्त्यावर रावेरपासून 500 मीटरच्या अंतरावर शेख मुस्तफा यांच्या शेतात मैताब गुलाब भिलाला हे मागील आठ वर्षांपासून कुटुंबासह राहतात. भिलाल कुटुंब बाहेरगावी गेल्याने शेतात घरात झोपलेल्या सविता मैताब भिलाला, राहुल भिलाला, अनिल भिलाला आणि सुमन भिलाला या चारही भावंडांची आरोपींनी हत्या केली होती व शुक्रवारी सकाळी शेत मालक शेतात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, शनिवारी दुपारी जिल्हा रूग्णालयाच्या शववाहिकेतून या चारही भावंडांचे मृतदेह रावेर येथे आणल्यानंतर आदिवासी परंपरेनुसार दफनविधी करण्यात आला. लोकसंघर्ष मोर्च्याच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांच्यासह पोलिस अधिकारी तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !