तर काळा हनुमान पतसंस्थेच्या चेअरमनसह संचालकांची मालमत्ता होणार जप्त !


भुसावळ सहकारी संस्थेच्या सहा.संचालकांच्या नोटीसीने उडाली खळबळ

भुसावळ : शहरातील काळा हनुमान पतसंस्थेत 37 हजार 500 रुपयांची मुदतठेव रक्कम 2004 मध्ये ठेवीदाराने ठेवली होती मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीची 75 हजारांची रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने जिल्हा ग्राहक मंचात दाद मागण्यात आली. त्यानंतर जिल्हा ग्राहक मंचाने ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये आदेश पारीत केले होते. त्यानंतर आदेशाची पूर्तता होत नसल्याने कलम 25 अन्वये वसुली प्रमाणपत्र जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले व त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी भुसावळ तहसीलदारांना वसुली प्रमाणपत्रान्वये रक्कम वसुलीचे आदेश दिले. तहसीलदारांनी नंतर हे प्रकरण भुसावळ सहकारी संस्थेच्या सहा.संचालकांकडे 9 सप्टेंबर 2010 रोजी वर्ग केले होते. त्यानंतरही वसुली होत नसल्याने ठेवीदार अभय ललवाणी यांनी भुसावळचे अ‍ॅड.राजेश उपाध्याय यांच्या माध्यमातून शासन दरबारी तक्रार केली. तक्रारीची दखल घेत भुसावळ सहकारी संस्थेच्या सहा.संचालकांनी काळा हनुमान पतसंस्थेचे चेअरमन व संचालक, व्यवस्थापकांची मालमत्ता जप्तीपूर्वी नोटीस 14 ऑक्टोबर 20 रोजी नोटीस बजावली आहे. दरम्यान, ठेवीदाराला 27 ऑक्टोबरपर्यंत रक्कम न मिळाल्यास तसेच 28 रोजी कार्यालयात हजर न राहिल्यास संस्थेविरुद्ध तसेच संचालकांविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 17 व 181 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे बजावण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !