कोरोनाचा नायनाट होण्यासह जनजीवन यावे पूर्वपदावर


नगरसेवक पिंटू कोठारी यांची आदिशक्तीच्या स्थापनेप्रसंगी प्रार्थना

भुसावळ : आदिशक्तीच्या आगमनाने शहरातील बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून शनिवारी शहरातील विविध भागात सुमारे 107 मंडळाकडून घटस्थापना करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत चार फूट उंचीच्या मूर्तीची शहर हद्दीत 41 तर बाजारपेठ हद्दीतील 66 मंडळांनी स्थापना केली.

कोरोनाचा व्हावा नायनाट : पिंटू कोठारी
भुसावळ शहरातील अष्टविनायक मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखदारपणे साजरा होतो मात्र यंदा महामारीमुळे व शासनाने घालून दिलेल्या नियमावलीमुळे यंदा केवळ चार फुटांची मूर्तीची घटस्थापना करण्यात आली. यावेळी नगरसेवक पिंटू कोठारी यांची आदिशक्तीच्या स्थापनेप्रसंगी जगातून कोरोनाचा नायनाट व्हावा, जनजीवन पूर्वपदावर यावे व शहरात शांतता नांदावी म्हणून आई सप्तश्रृंगीमुळे प्रार्थनाही केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !