बोरखेड्याच्या झोपडीतून जिल्हाधिकार्‍यांनी मदतीचे तर पोलिस अधीक्षकांनी फिरवले तपासाचे चक्र


रावेर : 14 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून चौघा भावंडांची हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील बोरखेडा गावाजवळील शेतात घडली होती. समाजमन सुन्न करणार्‍या या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी संयमाने परीस्थिती हातात तपासकामी एसआयटीची स्थापना करीत तिघा आरोपींना ताब्यात घेतले तर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील गृहमंत्र्यांच्या सूचनेनंतर पीडीत भिलाला कुटुंबाला मदतीसाठी लागलीच यंत्रणा कामाला लावली. विशेषतः घटनास्थळावरच थांबून अधिकार्‍यांनी कार्याला गती दिली.

अधीक्षक, जिल्हाधिकारी ऑन दी स्पॉट
उत्तर प्रदेशच्या हाथरस घटनेनंतर पोलिस प्रशासनावर सर्वत्र टिकेची झोड उठली होती व त्यातच बोरखेडा येथे चौघा भावंडांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. भिलाला कुटुंब बोरखेडा रस्त्याला लागून असलेल्या व लाईट नसलेल्या शेतातील घरात वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता रावेर पोलिसांना या चौघा भावंडांच्या हत्याकांडाची माहिती शेतमालकाकडून कळल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे घटनास्थळी पोहोचले. मयतांचे आई-वडील सुध्दा घरी पोहोचण्यापूर्वीच स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक घटनास्थळावर होते. भिलाला कुटुंबाचे सात्वंन करण्यासह आरोपींना गजाआड करण्याचे त्यांनी निर्देश दिले तर दुसरीकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीदेखील घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला कुटुंबाला सर्वोतोपरी मदतीच्या सूचना केल्या. दोघा आएएएस-आयपीएस अधिकार्‍यांनी भिलाला कुटुंबाच्या झोपडीत तासों-तास उभे राहुन या कुटुंबाला महसूल व आदिवासी प्रकल्प विभागाकडून काही मदत देता येईल का ? यासाठी प्रांताधिकारी अशोक कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याशी विविध योजनांची पडताळणी केली. अगदी रेशनपासून घरकुलापर्यंतची मदत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भिलाला कुटुंबाच्या झोपडीतून तपासाची चक्र फिरवत डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, एलसीबीचे निरीक्षक बापू रोहम, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांना मार्गदर्शन करीत तिघा अल्पवयीन आरोपीनां शुक्रवारी ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकाचे काम बघुन रावेरात आलेलल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील समाधान व्यक्त केले तसेच अन्य सामाजिक पुढार्‍यांनी सुध्दा समाधान व्यक्त केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !