रावेरात शेतकरी विधेयकाविरुद्ध काँग्रेसची स्वाक्षरी मोहिम


रावेर : शेतकरी विधेयकाविरोधात काँग्रेस पक्षातर्फे व्हर्चूअल रॅली नुकतीच काढण्यात आली होती व या पार्श्‍वभूमीवर रविवारी रावेरात आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात शेतकरी व कामगारांच्या हितासाठी जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. नागरीकांनी स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद व सहभाग द्यावा, असे आवाहन आमदारांनी केले.

रावेरात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात
रावेर तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने रविवारी प्रत्यक्ष स्वाक्षरी मोहिमेस सुरूवात करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी विधेयका विरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी किसान सेल तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, विनायक महाजन, राजु सवर्णा, भरत कुंवर, अय्युब मेंबर शेख, ग्यास संतोष पाटील, महेश लोखंडे, रमेश कदम, संजय जमादार, मिलिंद पाटील, रामदास लेहासे, प्रकाश सुरदास-राणे, महेंद्र पाटील, कांता बोरा, भुपेश जाधव, मनिषा पांचपांडे, मानसीत पवार, प्रतीक खराले, विनोद चौधरी, रुपाली परदेशी, गुणवंत सातव, युवराज मेंबर, सुभाष वानखेडे, दिलरूबा तडवी, नामदेव महाजन, पंकज डोळे, पंकज ब्रिजलाल वाघ ., रुपेश अटकोळ, विजय सोनवणे, दत्तू सोनार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !