भिलाला कुटुंबाना आदिवासी विभागातर्फे दोन लाखांची मदत
रावेर : बोरखेडा हत्याकांड प्रकरणातील पीडीत भिलाला कुटुंबीयांना आदिवासी विभागातर्फे तातडीची दोन लाखांची मदत सोमवारी करण्यात आली. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याहस्ते धनादेश, आधार कार्ड, रेशन कार्ड व बँक पासबुक रुमलीबाई भिलाला व संजय भिलाला यांना देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
बोरखेडानजीक भिलाला कुटुंब बाहेर गेले असतांना त्यांच्या चार मुलांची कुर्हाडीने हत्या करण्यात आली होती. या कुटुंबाला शासनाकडून सहकार्य म्हणून सोमवारी आदिवासी विकास विभागातर्फे दोन लाखांचा धनादेश तसेच महसूल विभागाकडून रेशन कार्ड, बँक पासबुक व आधारकार्ड तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी निळे निशान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर, काँग्रेस कार्यध्यक्ष राजू सवर्णे, उमेश गाढे, तलाठी दादाराव कांबळे, गृहपाल तडवी आदी उपस्थित होते.


