नंदुरबार गुन्हे शाखेची मोठी कारवाई : धडगावात दोन कोटी 21 लाखांचा गांजा जप्त

443 किलो गांजाची झाडे हस्तगत ; एक आरोपी ताब्यात, दुसरा पसार


नंदुरबार (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : धडगाव तालुक्यातील घाटली गावाच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल दोन कोटी 21 लाख 58 रुपये किंमतीची 443 किलो गांजाची झाडे जप्त केली. गांजाची लागवड व जोपासना केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत एकाला अटक करण्यात आली तर दुसरा पसार झाला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांना गांजाबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी निर्देश दिले. पथकाने धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटली गाव-शिवारात मका व तूर पिकाआड गांजाची लागवड केल्याचे स्पष्ट होताच पथकाने 443 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी शैलेश शंकर पावरा (घाटली, ता.धडगाव, जि.नंदुरबार) याला अटक केली तर दुसरा पसार झाला.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तावडे, मनोज महाजन, अभय राजपूत, निशिगंध गवळे, हेमंत बारी, विनोद पाटील, कल्पेश मोरे, राहुल पांढारकर आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !