भुसावळ लोहमार्गचा पोलिस कर्मचारी बेपत्ता
भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यातील कर्मचार्याची गैरहजेरी लावल्यानंतर उपनिरीक्षक व कर्मचार्यात जोरदार खडांजगी झाली होती व या प्रकरणी औरंगाबाद पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर लोहमार्गचे निरीक्षक दिनकर डंबाळे व उपनिरीक्षक कैलास जाधव यांची रविवारी रात्री तडकफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. दरम्यान, पोलिस कर्मचारी जयकुमार रमेश कोळी (42, महादेव टेकडी, कंडारी) हे बेपत्ता झाल्याबाबत लोहमार्ग पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. 16 रोजी रात्री ते रात्रपाळी ड्युटीसाठी गेले मात्र घरी न परतल्याने हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक पौर्णिमा राखुंडे करीत आहेत.

