साकेगावनजीक रुग्णवाहिका उलटली : सर्पदंश झालेल्या बालकाचा मृत्यू
स्टेअरींग रॉड जाम झाल्याने अपघात : डॉक्टरांसह पाच जण जखमी
भुसावळ : सर्पदंश झालेल्या बालकास उपचारार्थ गोदावरीत हलवत असताना रुग्णवाहिकेचा स्टेअरींग रॉड जाम झाल्याने वाहन उलटून अपघात झाला व या अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टर, चालकासह पाण जण जखमी झाले.सोमवारी सकाळी हा अपघात झाला. दरम्यान, सर्पदंश झालेल्या बालकाची भुसावळ-साकेगावदरम्यान प्राणज्योत मालवली. शंकर बाबुराव सावंत (11, डोलारखेडा, ता.मुक्ताईनगर) असे मयत बालकाचे नाव आहे.
नियतीचा असाही क्रुर खेळ
मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथील शंकर सावंत या बालकाला सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास डोलारखेडा, ता.मुक्ताईनगर येथील शंकर बाबुराव सावंत (वय 11) या बालकास सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उजव्या कानाच्या वरच्या बाजूस सर्पदंश झाल्यानंतर तो ओरडताच कुटूंबियांना सर्प दिसला व त्यांनी तत्काळ बालकास मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवले मात्र प्रकृती गंभीर असल्याने 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका रुग्णवाहिका (क्रमांक एम.एच.14 सी.एल.0827) मधून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात येत असतानाच भुसावळ ते साकेगावदरम्यान बालकाचा मृत्यू ओढवला मात्र अखेरचे प्रयत्न म्हणून डॉ.आमीर खान यांनी रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड केली असतानाच रुग्णालयापासून अवघ्या काही अंतरावर रुग्णवाहिकेचा पाटा तुटून स्टेअरिंगरॉडमध्ये आल्याने रुग्णवाहिका उलटली. या अपघातात रुग्णवाहिकेतील डॉ.अमीर खान (35), मृत बालकाचे वडील बाबुराव रुपचंद सावंत ( 35), दादाराव हिरामण साळुंखे (50), सुरजाबाई गुणवंत पाटील (35) व चालक रवी जंगले हे जखमी झाले. दुसरी रुग्णवाहिका बोलावल्यानंतर जखमींना उपचारार्थ हलवण्यात आले.


