रेल्वे प्रवाशांना नऊ नवीन रेल्वे गाड्यांचा दिलासा
सण-उत्सवात प्रवाशांची गैरसोय टळणार : सर्व गाड्या आरक्षित ; प्रवाशांना कोरोना नियमांचे करावे लागणार पालन
भुसावळ : आगामी सण-उत्सवांचे दिवस पाहता रेल्वे प्रवाशांसाठी नऊ रेल्वे विशेष उत्सव गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या आरक्षित असून रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीटानंतर या गाड्यांमध्ये प्रवेश दिला जाणार असून प्रवाशांना कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.
उधना-मंडूहादिह साप्ताहिक विशेष गाडी
डाउन 09057 उधना-मंडूहादिह साप्ताहिक विशेष गाडी 23 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी उधना स्टेशनहुन 8.20 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी मंडूहादिह स्टेशनवर 1:40 वाजता पोहोचेल. अप 09058 मंडूहादिह-उधना साप्ताहिक विशेष गाडी 25 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी प्रस्थान स्टेशनहुन 4.50 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी उधना स्थानकावर 9 वाजता पोहोचेल. या गाडीला नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिपूर, प्रयागराज छिवक्की तथा वाराणसी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

बांद्रा टर्मिनस-सहरसा साप्ताहिक विशेष हमसफर एक्स्प्रेस
डाऊन 02913 बांद्रा टर्मिनस-सहरसा साप्ताहिक विशेष हमसफर गाड़ी 25 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी प्रस्थान स्टेशनहुन 12.55 वाजता सुटल्यानंतर सहरसा स्टेशनला 3:55 वाजता पोहोचेल. अप 02914 सहरसा-बांद्रा टर्मिनस साप्ताहिक विशेष हमसफर गाडी 27 ऑक्टोबर ते 1 डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी सहरसा स्टेशनहुन 4.45 वाजता प्रस्थान करेल आणि बांद्रा टर्मिनसला 7.35 वाजता पोहोचेल. या गाडीला वापी, बलसाड, भेस्तान, नंदुरबार, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवव्क्की, दीनदयाल उपाध्याय, पटना, बेगू सराय, खगरीया स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
बांद्रा टर्मिनस-पटना साप्ताहिक विशेष गाडी
डाऊन 09271 बांद्रा टर्मिनस-पटना साप्ताहिक विशेष गाडी 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी धावेल. प्रस्थान स्टेशनहुन 4.35 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी पटना स्टेशनला 2.5 वाजता पोहोचेल. अप 09272 पटना-बांद्रा टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी 28 ऑक्टोबर ते 2 डिसेंबरदरम्यान दर बुधवारी पटना स्टेशनहुन 11.10 वाजता सुटले व दुसर्या दिवशी बांद्रा टर्मिनसला 7.35 वाजता पोहोचेल. या गाडीला बोरीवली, वापी, बलसाड, भेस्तान, नंदुरबार, भुसावळ, इटारसी, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, दीनदयाल उपाध्याय, पटना रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
उधना-छपरा विशेष गाडी
डाऊन 09019 उधना-छपरा विशेष गाडी 25 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी उधन स्थानकावरून 11.55 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी छपराला 6.15 वाजता पोहचेल. अप 09020 छपरा-उधना विशेष गाडी 27 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी छपरा स्थानकावरून 7.50 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी उधना येथे 12.15 वाजता पोहोचेल. या गाडीला नियम छपरा एक्स्प्रेसप्रमाणे थांबे देण्यात आले आहेत.
पोरबंदर-हावडा विशेष गाडी
डाऊन 09205 पोरबंदर-हावडा विशेष गाडी 21 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबरदरम्यान दर बुधवार व गुरुवारी प्रस्थान स्टेशनहुन आठ वाजता रवाना होईल आणि तिसर्या दिवशी हावडा स्थानकावर 03.35 वाजता पोहोचेल तर अप 09206 हावडा-पोरबंदर साप्ताहिक विशेष गाडी 23 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबरदरम्यान हावडा स्टेशनहुन 10.50 वाजता प्रस्थान करेल आणि तिसर्या दिवशी पोरबंदरला 6.10 वाजता पोहोचेल. हावडा एक्सप्रेसमध्ये या गाडीला थांबे असतील.
भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी
अप 02880 भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी व गुरुवारी प्रस्थान स्टेशन हुन 7.10 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला 13.35 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 02879 लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर विशेष गाडी 24 ऑक्टोबर ते 2 डिसेंबरदरम्यान दर बुधवारी व शनिवारी प्रस्थान स्टेशनहुन 12.15 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी भुवनेश्वरला 7.10 वाजता पोहोचेल. या गाडीला भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसप्रमाणे थांबे देण्यात आले आहे.
पूरी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड़ी
अप 02866 पूरी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 20 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी प्रस्थान स्टेशनहुन 5.25 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला 1.35 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 02865 लोकमान्य टिळक टर्मिनस-पूरी विशेष गाडी 22 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी प्रस्थान स्टेशनहुन 12.15 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी पूरीला 8.40 वाजता पोहोचणार आहे. पूरी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसप्रमाणे या गाडीला थांबे देण्यात आला आहे.
गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी
अप 05018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान दररोज प्रस्थान स्टेशनहुन 05.30 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला 6.05 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 05017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी 22 ऑक्टोबर ते 2 डिसेंबरदरम्यान दररोज प्रस्थान स्टेशनहुन 6.35 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्यटिळक टर्मिनसला 6.5 वाजता पोहोचणार आहे. नियमित गाडी गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल्सप्रमाणे थांबे देण्यात आले आहेत.
गोरखपुर-मुंबई विशेष गाड़ी
अप 02597 गोरखपूर-मुंबई विशेष गाडी 20 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी प्रस्थान स्टेशनहुन 08.30 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी मुंबईला 12.20 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 02598 मुंबई-गोरखपूर विशेष गाडी 21 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबरदरम्यान दर बुधवारी प्रस्थान स्टेशनहुन 1.30 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी गोरखपूरला 6.35 वाजता पोहोचणार आहे. नियमित गाडी गोरखपूर-मुंबई एक्सप्रेसप्रमाणे थांबे देण्यात आले आहेत.

