अत्याचाराच्या घटनेतील नराधमांना द्यावी फाशी
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे भुसावळ प्रांतांना निवेदन
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून एकाच कुटुंबातील चौघा भावंडाची हत्या करणार्या आरोपींना तसेच भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे पाच वर्षाच्या अल्पवयीन मतीमंद बालिकेवर अत्याचार करणार्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रसंगी करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, प्रदेश सचिव रणजीत राजपूत, प्रशांत ठाकूर, अभिजीत पाटील, चंदू चौहान, आनंदा पाटील, संदीप राणा, सोनी ठाकूर, अनिल राजपूत, समाधान महाजन, सागर महाजन, जय चौधरी, महेश महाजन, वैभव महाजन, हितेश महाजन, निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील व असंख्य राजपूत समाजबांधव उपस्थित होते.

