रेल्वे प्रवाशांसाठी चार ‘उत्सव ट्रेन’
भुसावळ : आगामी सण-उत्सवांच्या दिवसांमुळे रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी पाहता गोरखपूर व मडगांव दरम्यान उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर सुपर फास्ट ट्रेन
डाऊन 02165 लोकमान्य टिलक टर्मिनस-गोरखपूर सुपर फास्ट गाडी 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान गुरुवारी व सोमवारी प्रस्थान स्थानकावरून 5.23 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी 11.25 वाजता गोरखपुर स्टेशन ला पोहचेल. अप 02166 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट विशेष गाडी 23 ऑक्टोबर ते 1 डिसेंबरदरम्यान दर शुक्रवारी व मंगळवारी प्रस्थान स्थानकावरून 3.45 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी रात्री 9.30 लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनला पोहचेल. या गाडीला नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, जंघई, भदोयी, वाराणसी, मउ, देवरीया आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. दरम्यान, आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे शिवाय प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान कोरोना नियमांचे प्रवाशांना पालन करावे लागणार आहे

नागपूर -मडगांव विशेष गाडी
अप 01235 नागपूर-मडगाव विशेष गाडी 23 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी प्रस्थान स्टेशनहुन चार वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 4.40 वाजता मडगावला 4.40 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 01236 मडगांव-नागपूर विशेष गाडी 24 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरदरम्यान दर शनिवारी प्रस्थान स्थानकावरून 7.40 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 8.30 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक, ईगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कनकवली, सिंधुदुर्ग, कुडाल, सावंतवाडी रोड, थिवंम, करमाली रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

