कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण
मुंबई : कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून या बाबतची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करून दिली आहे. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. वळसे पाटील आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रीपोर्ट पॉझीटीव्ह आले असून माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे.
यांनाही झाली कोरोनाची बाधा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, देवेंद्र भुयार, राहुल नार्वेकर, गोपीचंद पडळकर, प्रवीण पोटे या आमदारांना कोरोनाची लागण झाली होती तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


