भुसावळात 25 रोजी भोरगाव लेवा पंचायतीचा परिचय मेळावा

लोकप्रतिनिधींसह मान्यवरांची राहणार उपस्थिती


भुसावळ (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेतर्फे विधवा, विधूर, घटस्फोटित तसेच प्रौढ विवाह इच्छुक वधू-वरांसाठी परिचय मेळावा व वधू-वर सूची प्रकाशन सोहळ्याचे आयोजन रविवार, 25 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. शहरातील प्रभाकर हॉलमध्ये होणार्‍या परिचय मेळाव्याला केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांची उपस्थित राहणार आहे.

वधू-वर सुचीचे प्रकाशन
विवाह संस्थेला बळकटी देण्यासोबतच विविध कारणांमुळे विवाहापासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना नव्याने संसाराची संधी मिळावी, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून भोरगाव लेवा पंचायततर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यंदाच्या मेळाव्यात विवाह व पुर्नविवाह इच्छुक वधू-वरांची सूची प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ विभागाचे प्रमुख सुहास चौधरी यांनी दिली.

तीन मान्यवरांचा होणार पुरस्काराने सन्मान
या सोहळ्यात समाज व सार्वजनिक जीवनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या तीन मान्यवरांचा लेवा शिरोमणी समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करणार आहे. यामध्ये आमदार एकनाथराव खडसे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. यावेळी भरत महाराज बेळीकर यांचीही उपस्थिती असेल.

इच्छूक वधू-वरांना सहभागाचे आवाहन
समाजातील विवाहेच्छुक वधू-वर तसेच त्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यक्रम प्रमुख आरती चौधरी, उपाध्यक्ष महेश फालक, सचिव सुभाष भंगाळे व पंचायतीच्या संचालकांनी केले आहे. यशस्वीतेसाठी भोरगाव लेवा पंचायतीच्या पदाधिकार्‍यांकडून अचूक नियोजनावर भर आहे. इच्छुकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !