भुसावळात किरकोळ कारणावरून मारहाण : तिघांविरूध्द गुन्हा


भुसावळ : शहरातील पासी वाड्यात मद्य प्रशासनासाठी पैसे न दिल्याने एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पासी वाड्यात शनिवारी रात्री 10.30 वाजता सोहनलाल पासी हे घराच्या बाहेर बसलेले असतांना त्यांच्या भाचा राहूल हा पळत आला, त्याच्या मागे तीन युवक पळत आले आणि त्यांनी राहुल याला मारहाण केली. मारहाणीतून राहुल सोडविले असता तिघा युवकांनी दांड्याने राहुलच्या डोक्यात प्रहार केल्याने तो जखमी झाला. यावेळी मारहाणीचे कारण संशयीत आरोपी गोल्या अनु परदेशी, गौरव आणि युवराज (पूर्ण नाव माहिती नाही, रा.शनि मंदीर वॉर्ड, भुसावळ) यांनी सांगितले की राहलला आम्ही दारू पिण्यास व सिगरेट पिण्यास पैसे मागितले असता त्याने नकार दिला. जखमी राहुल यांच्यावर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वाल्मीक सोनवणे हे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !