शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा विभागात निषेध


भुसावळसह यावल व रावेरात प्रशासनाला काँग्रेस-राष्ट्रवादीचे निवेदन : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा

भुसावळ : शहर व विभागात शेतकरी विरोधी पारीत करण्यात आलेल्या काळ्या कायद्याला विरोध दर्शवण्यात आला तसेच दिल्लीत शेतकर्‍यांनी आंदोलनाला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दर्शवण्यात आला. तहसील प्रशासनाला ठिकठिकाणी निवेदनही देण्यात आले.

रावेरात प्रशासनाला निवेदन
रावेर : रावेर तालुका व रावेर शहर काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळ्या कायद्याविरोधात देशातील शेतकर्‍यांनी दिल्ली येथे केलेल्या आंदोलनाच्या प्रभावी कार्यास सलाम करीत काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्यासह जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील आदेशाने जाहिर पाठींबा व निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भवर कुंवर, राजीव सैवणे, मनिषा पाचपांडे, मानसी पवार, विनायक महाजन, कांताताई बोरा, प्रतीतक खरोलेे, दिलरुबा तडवी, सलीम शेख, डॉ.शब्बीर शेख, प्रतिभा मोरे, रामदास लहासे, प्रकाश विष्णू सूरदास, सुर्यभान चौधरी, भूपेश, संतोष पाटील, शबाना तडवी, रमेश कदम, पंकज सुपे, गुलशेर तडवी, सावन मेढे, धुमा तायडे, डॉ.प्रेमराज पाटील, संजय तडवी, राजेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, यशवंत धनके, वाय.एस.महाजन, शिवाजी येवले व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुसावळात काँग्रेस कमेटीचे निवेदन
भुसावळ : केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधात काळे कायदा संमत केल्याचा निषेध व्यक्त करीत दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांनी आंदोलन उभारले या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड.संदीप सुरेश पाटील यांच्या सूचनेनुसार व उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक योगेंद्रजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाद्वारे भुसावळ येथील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक योगेंद्रभैय्या पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष ईस्माईल गवळी, काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, कुणाल सुरळकर, राहुल कडेरे, तुळशीराम खरारे, गोलू बगाडे, गोलू इंगोले, भीमराव सपकाळे, विक्रम वानखेडे, महेश सपकाळे, मुसा पिंजारी, आरीफ शेख तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी संघर्ष संघटनेचाही पाठिंबा
भुसावळ :केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदा रद्दसाठी दिल्लीत सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला शेतकरी संघर्ष संघटनेने पाठिंबा दर्शवत प्रशासनाला निवेदन दिले. केंद्र सरकारने नुकतेच देशातील शेतकर्‍यांच्या विरोधात तीन कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर केले होते. या कायद्यामुळे सामान्य शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान होणार असून अल्पभूधारक शेतकरी यामध्ये भरडून निघणार आहे. हे कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकरी संघर्ष संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. निवेदनावर भुसावळ शहराध्यक्ष देवेंद्र वराडे, तालुका कार्याध्यक्ष भिकाजी बाणाईत, शहर सचिव सचिन जगताप, युवा शहर उपाध्यक्ष चेतन कपिले, सोशल मिडिया जिल्हा कार्याध्यक्ष सौरभ फेगडे, सदस्य जगदीश कोल्हे, सदस्य भूषण भंगाळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

यावल शहरात धरणे आंदोलन
यावल : यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे तहसील कार्यालयात दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत धरणे आंदोलन करण्यात आले. जि.प.गटनेते व व तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धरणे आंदोलनात ज्येष्ठ हाजी शब्बीरसेठ, जिल्हा इंटक अध्यक्ष भगतसिंग बापू पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती नितीन चौधरी, पंचायत समिती गटनेता शेखर पाटील, अनुसूचित जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे, खलील सेठ, अमोल भिरुड, हाजी गफ्फार शाह, सतीश पाटील, जलिल पटेल, शहराध्यक्ष कदीरभाई खान, संदीपभैय्या सोनवणे, पुंडलिक बारी, अनुसूचित जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत तायडे, अनुसूचित जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भालेराव, अजय बढे, नईम भाई शेख, वसीम खान, इखलास सय्यद, रहेमान खाटीक, इम्रान पहेलवान, राजूभाऊ करांडे, विनोद पाटील, भूषण भाऊ, सकलेन शेख, जागो भाई, अनिल अशपाक शहा पाटील, लिलाधर सोनवणे, धीरज सोनवणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !