जलयुक्तच्या निकृष्ट कामांबाबत हिवाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करणार


रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांची ग्वाही : शासन निधीचा अपव्यय

रावेर : रावेर तालुक्यातील सुमारे 13 कोटींच्या निकृष्ट जलयुक्त शिवार कामांबाबत आगामी हिवाळी अधिवेशनात चौकशीचा प्रश्न उपस्थित करणार असल्याची ग्वाही आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. तालुक्यात जलयुक्तच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भष्ट्राचार झाला असतानाही प्रशासकीय अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

नागरीकांमध्ये तीव्र संताप
रावेर तालुक्यातील 19 गावांमध्ये सुमारे 13 कोटी रुपये खर्च करून शासनाने पाण्याची पातळी वाढवण्यासाठी खर्च केले होते. त्यावेळच्या तात्कालीन अधिकारी व ठेकेदारांनी या पैश्यांची प्रचंड उधळपट्टी केली होती. या जलयुक्त शिवारची बरीच कामे तालुक्यातील आदिवासी भागात झाली होते परंतु 13 कोटींच्या खर्चातून निकृष्ट कामांमुळे भ्रष्टाचार बोकाळला शिवाय या भागात पाण्याची पातळी न वाढल्याने नागरीकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहत.

अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार : आमदार चौधरी
रावेर तालुक्यात 13 कोटी रुपये खर्च करून झालेल्या निकृष्ट कामांची आगामी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे. जलयुक्त शिवाराच्या कामांची चौकशीसाठी राज्य सरकारने समिती गठीत केली आहे. रावेर तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामांची चौकशी करण्यासंदर्भात येणार्‍या अधिवेशनात आवाज उचलणार असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.

तत्कालीन अधिकारी रडारवर
रावेर तालुक्यात जलयुक्त शिवार कामांची चौकशीचा मुद्दा विधानसभेत उचलला जाणार असल्याने निकृष्ट कामांकडे दुर्लक्ष करणारे तत्कालीन अधिकारी रडारवर असणार आहे. त्यांच्याच दुर्लक्षामुळे जलयुक्त शिवार योजना चौकशीच्या फेर्‍यात अडकली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !