सारोळा येथे एमआयडीसी निर्मितीच्या हालचाली


पालकमंत्र्यांसह आमदार चंद्रकांत पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथे अनुकूल परीस्थिती असलेल्या परीसरात औद्योगिक वसाहतीची निर्मिती व्हावी अशा मागणीचे पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात एमआयडीच्या मागणीसंदर्भात औचित्याचा मुद्दा (तारांकित प्रश्‍न) मांडला होता. त्यानंतर अवघ्या दोनच महिन्यात औद्योगिक विभागाच्या अधिकार्‍यांच्या एका पथकाने स्थळ निरीक्षण करून सारोळा परीसरातील जागा एमआयडीसीसाठी अनुकूल असल्याचे मत व्यक्त करून तसा अहवाल शासनाकडे पाठविला होता. या संदर्भात राज्याचे पाणीपुरवठा मंत्रीगुलाबराव पाटील यांच्या विनंतीवरून 3 डिसेंबर 2020 रोजी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताईनगर संघातील सारोळा परीसरात एमआयडीसी निर्मिती संदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली.

यांची होती उपस्थिती
बैठकीत चर्चेवेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रालयातील उद्योग विभाग व महसूल विभागाचे सचिव तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरूच ठेवल्याने गेल्या आठवड्यात महसूल विभागाने सारोळा परीसरातील जमिनीचा अद्यारुप गोषवारा मागविला होता, याची पूर्तता स्थानिक महसूल प्रशासनाने केलेली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !