भाजपा जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हाजी अल्लाउद्दीन सेठ
जिल्हा सरचिटणीसपदी डॉ.सादिक शेख सकाउद्दीन शेख यांची निवड
वरणगाव : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी वरणगावचे हाजी अल्लाउद्दीन शेख हुसेन तर वरणगावचे डॉ.सादीक शेख सकाउद्दीन शेख यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आरीफ शेख यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती केली. हाजी अल्लउद्दीन शेख हे भारतीय जनता पार्टीचे सर्वात 1985 पासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते असून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असे नेतृत्व आहेत.
दोघा पदाधिकार्यांच्या निवडीनंतर माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष सुनील माळी यांनी अभिनंदन केले आहे.


