‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला

मुलींच्या वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग


जळगाव (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील मुलींच्या वसतिगृहात कायमस्वरूपी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात उत्साहात पार पडला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण वसतिगृह परिसर दुमदुमून गेला.

यांची होती उपस्थिती
या मंगलमय सोहळ्यास माजी खासदार डॉ.उल्हास पाटील प्रमुख अतिथी होते. डॉ.वैभव पाटील, डॉ.प्रशांत सोळंके, डॉ.प्रेमचंद पंडित, प्रमोद भिरूड, अधीक्षिका हर्षा कोल्हे, प्राचार्या प्रा.डॉ.विशाखा गनवीर, उपप्राचार्या प्रा.जॅसिंथ धया, डी.के.पी.सी.ओ.एन.चे प्राचार्य शिवानंद बिरादार, मुख्य परिचारिका अधीक्षक संकेत पाटील तसेच उपमुख्य परिचारिका अधीक्षिका मनीषा खरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाची सुरुवात पुरोहीत संदीप का.वैदय यांनी कर्मचारी गणेश नांदुरकर यांच्याहस्ते सपत्नीक विधीवत मंत्रोच्चाराच्या मंगलमय वातावरणात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना करून घेतली. यानंतर आरती करण्यात आली. वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी सर्वांच्या सुख-शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !