गावपंचायतींच्या प्रभारींचा उद्या‘फैसला’


ग्रामपंचायत निवडणुकीनंतर 18 जानेवारी रोजी होणार मतमोजणी : भुसावळ विभागात किरकोळ वाद वगळता निवडणूक शांततेत

भुसावळ : भुसावळ विभागात शुक्रवार, 15 रोजी ग्रामपंचायतींच्या प्रभारी निवडीसाठी किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया आटोपली. निवडणुकीनंतर आता उमेदवारांच्या विजयाच्या चर्चा सुरू झाल्या असून प्रत्यक्ष सोमवार, 18 रोजी निकालाअंती चित्र स्पष्ट होणार आहे. विभागात भुसावळ तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीसाठी 97.96, रावेर तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींसाठी 81.97, बोदवड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींसाठी 78.81, मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीसाठी 80.81 टक्के मतदान झाले.

भुसावळ तालुक्यात 67.85 टक्के मतदान
भुसावळ : तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत 39 हजार 274 पुरुष मतदारांपैकी 27 हजार 36 मतदारांनी, तर 35 हजार 726 महिला मतदारांपैकी 23 हजार 851 महिलांनी (66.76 टक्के) हक्क बजावला. एकूण 67.85 टक्के मतदान तालुक्यात झाले. तहसीलदारी दीपक धीवरे, नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया आटोपली.


भुसावळात 12 टेबलावर मतमोजणी
भुसावळात सोमवारी सकाळी 10 वाजेपासून तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामात मतमोजणी होईल. गोदामात 12 टेबल लावले जाणार असून त्यासाठी 103 कर्मचारी नियुक्त आहेत. एका टेबलावर एक पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि शिपाई असे तीन असतील. सहा टेबलवर एक रो ऑफिसर असतील त्यात गटविकास अधिकारी व पालिकेचे मुख्याधिकारी यांची नियुक्ती असेल. प्रवेशद्वारावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सहा मोठ्या ग्रामपंचायतीत पहिल्या टप्यात साकेगाव, पिप्रीसेकम, दर्यापूर, कंडारी, खडके आणि कुर्‍हे पानाचे तर दुसर्‍या सहा टेबलवर मांडवेदिगर, मन्यारखेडा, किन्ही, पिंपळगाव, सुसरी, साकरी यांची मतमोजणी होईल तर दुसर्‍या टप्यात फेकरी, काहूरखेडा, टहाकळी, जोगलखेडा, बेलव्हाय या ग्राम पंचायतीसाठी मतमोजणी होईल. नंतर उर्वरीत ग्रा.पं.साठी मतमोजणी होईल. दरम्यान, विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढण्यास वा डीजे तसेच अन्य वाद्य लावल्यास बंदी आहे

रावेर तालुक्यात शांततेत मतदान
रावेर : प्रशासनाच्या कुशल रणनीतीमुळे रावेर तालुक्यात 48 ग्राम पंचायतीच्या निवडणूक शांततेत पार पडल्या. आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोमवार, 18 रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरुवात होणार आहे. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या कुशल रणनीतीमुळे तालुक्यात कुठेही आचारसंहिता भंगाची तक्रार नाही.

ग्रामपंचायत निहाय मतदान असे
रावेर तालुक्यातील 48 गावात झालेले मतदान असे- गौरखेडा 94.26, खिर्डी खुर्द 78.36, तामसवाडी 87.54, मस्कावदसीम 84.64, मस्कावद खुर्द 67.38, मस्कावद बु.॥ 79.50, धामोडी 86.12, पुनखेडा 88.69, मोरगाव बु.॥ 89.30, मोरगाव खुर्द 80.28, शिंदखेडा 75.83, रायपूर 79.72, गहुखेडा 87.39, उदळी खुर्द 77.64, उदळी बु.॥ 84.01, तासखेडा 86.00 पाडळे खुर्द 3.47, अजनाड-चोरवड 93.68, मुंजलवाडी 89.11, खिरोदा प्र.रावेर 91.91, खानापूर 79.79, निरुळ 82.24, भोकरी 86.70, तांदलवाडी 81.67, मांगलवाडी 90.78, पूरी-गोलवाडे 80.63, भोर 86.48, कोचुर बु.॥ 84.66, कर्जोद 80.98, वाघोड 83.42, केर्‍हाळा खुर्द 83.61, केर्‍हाळा बु.॥ 84.13, वघाडी 85.51, रसलपूर 82.46, रमजीपूर 94.25, बक्षीपूर 89.19, निंबोल 81.38, ऐनपूर 73.35, वडगाव 89.22, रेंभोटा 79.05, दसनूर 82.85, कोळोदा 95.24, अहिरवाडी 82.04, विवरे खुर्द 75.94, सुदगाव 80.48, निंभोरा बु.॥ 77.59, विवरे बु.॥ 80.42, सुलवाड़ी 91.37.

निवडणुकीसाठी यांनी केले सहकार्य
स्थानिक प्रशासनाच्या कुशल रणनीतीमुळे कुठेही आचार संहिता भंग झाला नाही. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तहसीलदार एम.जे.खारे, सी.जी.पवार, हर्षल पाटील, मनोज लडके, शिवकुमार लोळपे, दत्तात्रेय मांडवकर, महेश रांझुनू, महेश गजरे, अजीत जमादार, इंद्रजीत भारंबे, प्रवीण पाटील यांनी परीश्रम घेतले. पोलिस निरीक्षक रामदास यांनी चोख बंदोबस्त राखल्याने अप्रिय घटना टळल्या.

निंभोरा पोलिस ठाणे हद्दीत शांततेत निवडणूक
खिर्डी : निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीत एकूण 16 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी शांततेत पार पडली. सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली 69 बुथवर चोख बंदोबस्त लावण्यात आल्याने कुठेही अप्रिय घटना घडली नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सीआरपीसी 149 प्रमाणे 48 जणांना नोटीस बजावण्यात आल्या तसेच सीआरपीसी 107 प्रमाणे 28 जणांवर कारवाई व सीआरपीसी 110 प्रमाणे सहा जणांवर कारवाई करण्यात आली तसेच ग्रामपंचायत निवडणूक कमी उमेदवार म्हणून उभे असलेल्या सर्व उमेदवारांना सीआरपीसी 149 प्रमाणे बजाविण्यात आली. निवडडणुकीसाठी प्रक्रिया सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. स्वप्निल उनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री मनोहर जाधव, पोहेकॉ /राकेश वराडे, पोना/स्वप्नील पाटील व पोलीस कर्मचारी वर्ग अशांनी अत्यंत चोख पार पाडली.

बोदवड तालुक्यात 78.81 टक्के मतदान
बोदवड : तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी 15 रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली व 78.81 टक्के मतदान झाले. 237 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून आता या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला सोमवारी होणार आहे. या निवडणुकीत 29 पैकी आधीच दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 15 रोजी 27 ग्रामपंचायतीच्या 237 उमेदवार निवडीसाठी मतदान घेण्यात आले. एकूण 80 मतदान केंद्रावर मतदान झाले. 450 कर्मचारी निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्ती करण्यात आले होते. यात पाच झोनल ऑफिसर, 16 निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस प्रशासनाचे तीन अधिकारी, 64 पोलीस कर्मचारी 42 पुरुष होमगार्ड, 9 महिला होमगार्ड यांचा समावेश होता. या निवडणुकीत 14 हजार 248 पुरुष तर 12 हजार 956 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने तालुक्यात एकूण 78.81 मतदान झाले. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी काम पाहिले. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त राखण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !