निंभोरा येथे एकाची आत्महत्या


भुसावळ : तालुक्यातील निंभोरा बु.॥ येथील रहिवासी प्रशांत दिनकर सोनवणे (33) या इसमाने शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबतची माहिती कळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्‍यांनी धाव घेतली. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार प्रेम सपकाळे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !