जनार्दन पवार भुसावळ पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी

पंधरवड्यात तिसर्‍यांदा बदलले अधिकारी : कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने कामे मंदावली


भुसावळ (मंगळवार, 1 ऑगट 2026) : भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले रजेवर असल्याने सध्या प्रभारी मुख्याधिकारी राजवट सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने या पंधरवड्यात तब्बल तीनवेळा प्रभारी मुख्याधिकार्‍यांची खांदेपालट केली आहे. 14 ऑगस्ट रोजी प्रभारी मुख्याधिकारी विवेक धांडे यांचा पदभार काढून वरणगावच्या मुख्याधिकार्‍यांना पदभार दिला गेला. यानंतर पुन्हा धांडे व आता तिसर्‍यांदा नगरविकास शाखेचे सहआयुक्त जनार्दन पवार यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे.

शहरात विकासकामे मंदावली
उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या भुसावळ नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याने प्रशासकीय कामकाजाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. शेंदूर्णी येथील मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्याकडे असलेला प्रभारी मुख्याधिकारी पदाचा कारभार 14 ऑगस्ट रोजी काढून वरणगावचे मुख्याधिकारी राहुल भोये यांच्या नावाची ऑर्डर निघाली मात्र त्यानंतर तीन दिवसांत म्हणजे 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पुन्हा विवेक धांडे यांच्याकडे पदभार आला व पुन्हा 12 दिवसांनी धांडेंचा पदभार काढून जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास शाखेचे सहआयुक्त जनार्दन पवार यांच्याकडे देण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी 30 ऑगस्ट रोजी आदेश काढले आहेत.


आता प्रभारी मुख्याधिकारी जनार्दन पवार पालिकेला किती वेळ देवू शकतील, यावर शहरातील विकासकामांचा वेग अवलंबून राहणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !