भुसावळात गोळीबार : पाच दरोडेखोर जाळ्यात


सिनेस्टाईल पाठलाग करून पाच आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या : पोलिसांना पाहताच दहशतीसाठी केला गोळीबार

भुसावळ : दरोड्याच्या उद्देशाने जळगाव रस्त्यावरील लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ लपून असलेल्या पाच दरोडेखोरांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळत त्यांच्याकडून दोन जिवंत काडतूसासह गावठी कट्टा व दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. शनिवारी रात्री 12 वाजेनंतर ही कारवाई करण्यात आली तर गस्तीवरील पोलिसांना पाहताच संशयीतांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला मात्र पोलिसांनी जीवाची बाजी लावत संशयीतांचा मुसक्या आवळत त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दरोड्याच्या प्रयत्नातील पाच आरोपी जाळ्यात
भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे हवालदार इकबाल अली इब्राहीम अली सैय्यद, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, समाधान पाटील, होमगार्ड मायकल, प्रसाद हे पोलिस वाहन (एम.एच.19 एम.0632) ने चालक हवालदार चंद्रशेखर गाडगीळ यांच्यासह शनिवारी रात्री गस्तीवर असताना लोणारी मंगल कार्यालयासमोरून जात असताना काही संशयीत अंधारात असल्याने वाहन थांबवल्यानंतर त्यातील एकाने भागो रे पुलिस आयी म्हणत पळ काढला तर दुसर्‍याने हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण केली मात्र अशाही परीस्थितीत पोलिसांनी पाठलाग करीत राकेश उर्फ डीडी राजू बारे (20) व भूषण उर्फ टक्या यशवंत मोरे (20, हुडको कॉलनी, भुसावळ) यांना पकडले व घटनेची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना दिल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा आरोपींची खोलवर चौकशी केल्यानंतर त्यांनी साथीदार विल्सन अलेक्झांडर जोसेफ (27), सागर आनंदा पारधे (30), ऑस्टीन शरद रामटेके (21, सर्व रा.हुडको कॉलनी, भुसावळ) सोबत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !