अभियानात पहिल्याच दिवशी 28 लाख 51 हजारांचा निधी समर्पित
भुसावळ : अयोध्येतील नियोजित श्रीराम जन्मभूमी मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून संक्रांतीपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून त्यासाठी निधी संकलन सुरू आहे. निधी संकलन हे मकर संक्रांतीपासून सुरू होणार असून ते माघ पौर्णिमेपर्यंत जारी राहणार आहे. अभियानाच्या पहिल्याच दिवशी भुसावळ जिल्ह्यात जवळपास 28 लाख 51 हजार रुपयांचा निधी गोळा झाला.
प्रत्येक रामभक्ताची मदत
राम मंदिरासाठी देशभरातील प्रत्येक राम भक्ताची मदत घेतली जात आहे. यासाठी कार्यकर्ते प्रत्येक घराघरात जात आहे. मकर सक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार्या निधी संकलन कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते चार लाख गावांच्या 11 कोटी कुटुंबीयांशी संपर्क साधणार आहेत. तसेच त्यांना श्री राम जन्मभूमीशी जोडून त्याचा प्रचार करण्यात येत आहे. देशातील प्रत्येक जाती, मताच्या, पंथाच्या आणि संप्रदायाच्या लोकांच्या सहयोगातूनच राम मंदिर वास्तवात एक राष्ट्र मंदिराचं रूप घेईल. गावांमध्ये आणि शहरांमध्ये सुरू करण्यात येणार्या अभियानात भक्तांनी स्वैच्छिकरीत्या केलेली आर्थिक मदत स्वीकारली जाणार आहे. तसेच यासाठी 10, 100 आणि एक हजार रुपयांचे कुपन्स उपलब्ध असतील. प्रत्येक घरांमध्ये या भव्य मंदिराची प्रतिमा पोहोचवली जाणार आहे. सर्वांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



