श्रीराम मंदिर उभारणीसाठी माजी मंत्री गिरीश महाजनांनी दिली भरीव देणगी


भुसावळ : अयोध्या निधी समर्पण अभियानाच्या पहिल्याच दिवशी माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी पाच लाख एक हजार 111 रुपयांच्या देणगीने शुभारंभ झाला. शुक्रवार, 15 जानेवारी 2021 रोजी श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयातर्फे निधी संकलन अभियानास सुरुवात करण्यात आली. अभियानाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारी 2021 ला निधी संकलनासाठी शहरातील विविध मान्यवर व्यक्तींच्या भेटी गाठी घेण्यात आल्या.

माजी मंत्र्यांकडून भरीव देणगी
या अभियानांतर्गतच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या निवासस्थानी श्रीराम मंदिर, अयोध्या निधी समर्पण अभियानाचे कार्यकर्ते आले असता माजी मंत्री गिरीष महाजन यांनी पाच लाख एक हजार एकशे अकरा रुपये तसेच जामनेर नगरीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना गिरीष महाजन यांनी 51 हजारांचा धनादेश तालुका अभियान प्रमुखांकडे दिला. याप्रसंगी गिरीष महाजन यांनी 1992 च्या कारसेवेच्या आठवणींना उजाळा दिला तसेच श्रीराम मंदिर, अयोध्या निधी समर्पण अभियानास शुभेच्छा दिल्यात.


यांची होती उपस्थिती
यावेळी उपस्थित संघ कार्यवाह निलेश माळी, विहिंप प्रखंड मंत्री प्रवीण सुशीर, सह अभियान प्रमुख गजानन माळी, हिशोब प्रमुख श्याम मुळे, सह हिशोब प्रमुख सदानंद देशपांडे, कार्यालय प्रमुख सुखदेव महाजन, केदारजी ओक, गजानन लोणारी, महाले आप्पा, किशोर झांबरे, गोपाल बुळे, नाना सातवे, कर्ण बारी, आकाश नेमाडे, आशुतोष पाटील, गुंजन लोढा, राहुल माळी व छगन दादा झाल्टे, जालमसिंग राजपूत, दीपक तायडे, सदानंद माळी आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !