भुसावळात रोटरी सायक्लोथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद !


भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आयोजित सायक्लोथॉन रॅली अत्यंत उत्साहात आणि जोषपूर्ण वातावरणात रविवारी पार पडली. ‘स्वच्छ भुसावळ, प्रदूषण रहित भुसावळ’ हे घोष वाक्य असलेल्या या रॅलीत 600 हून अधिक सायकलस्वारांनी नोंदणी केली होती. ज्यात चार वर्षांच्या चिमुरड्या पासून 70 वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांनी रॅली पूर्ण करून सायकलिंगचा आनंद घेतला.

तीन विभागात झाली स्पर्धा
भुसावळसहित जळगाव, जामनेर व यावलचे सायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले. त्याबरोबरच महिला सायकलस्वारांचीदेखील लक्षणीय उपस्थिती होती. 5, 10 आणि 20 किमी अशा तीन विभागांमध्ये ही रॅली काढण्यात आली. सकाळी पाच वाजेपासून आबालवृद्धांनी डी.एस.ग्राउंडवर लगबग सुरू केली. 20 किमीसाठी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, इव्हेंट सदिच्छादुत प्रवीण फालक , 10 किमी साठी डी आर एम विवेक गुप्ता, नगराध्यक्ष रमण भोळे, रेल सिटी अध्यक्ष संदीप जोशी आणि प्रोजेक्ट चेअरमन सन्मीत पोतदार यांनी, तर पाच किमीसाठी आमदार संजय सावकारे, सदिच्छा दुत डॉ.सुजाता केळकर, विशाल शाह आणि डॉ.मकरंद चांदवडकर यांनी झेंडा दाखवून मार्गस्थ केले. आमदार सावकारे यांनी स्वतः सायकल चालवत पाच किमी रॅली पूर्ण केली. रॅलीनंतर भुसावळ नगरपरीषदेच्या प्रेरणेने सर्वांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ घेतली व रॅलीत सहभाग नोंदवला.


यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, स्वच्छता प्रमुख गौरव अहिरे, पाणीपुरवठा अभियंता नितीन लुंगे, सतीश देशमुख, प्र.आरोग्य अधिकारी प्रदीप पवार, वसंत राठोड व नगरपरीषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यानंतर लकी ड्रॉ द्वारे सहा भाग्यवान विजेते निवडले गेले. यात निलेश पाटील, धीरज राठोड व छोटू गवळी हे हेल्मेट विजेते आणि मृत्युंजय कुमार, सार्थक बाविस्कर व अनिल जोशी हे तीन सायकल विजेते ठरले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक रौनक रुपेश जैन, सुवर्णा सायकलचे दलजीत चौधरी, रीदम हॉस्पिटलचे डॉ.नागला, आमदार संजय सावकारे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, नगराध्यक्ष रमण भोळे, रेल सिटीचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शाह, प्रोजेक्ट चेअरमन सन्मीत पोतदार, डॉ.मकरंद चांदवडकर सदिच्छा दूत प्रवीण फालक, डॉ.सुजाता केळकर आदी उपस्थित होते. रोटरी रेल सिटीचे सदस्य अमित भडंग यांनी सूत्रसंचालन केले. संदीप सुरवाडे यांनी शपथ वाचन केले तर विशाल शाह यांनी आभार प्रदर्शन केले. यशस्वितेसाठी रोटरी रेल सिटीच्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !