यावल तालुक्यात काँग्रेस-भाजपाकडून सत्ता स्थापणेचे दावे-प्रतिदावे


यावल : तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीच्या 359 सदस्य निवडीसाठी झालेल्या निवडणुकीनंतर सोमवारी लागलेल्या निकालानंतर अनेक ग्रामपंचायतींवर काँग्रेस-भाजपाकडून सत्ता स्थापणेचे दावे-प्रतिदावे होत असलेतरी प्रत्यक्षात सत्ता स्थापण्यासाठी सरपंच पद आरक्षण निर्णायक ठरणार आहे. सोमवारी तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त राखण्यात आला.

तहसीलला यात्रेचे स्वरूप
सोमवारी सकाळपासून तहसीलसमोरील सुमारे 10 एकर शेत गर्दीने फुलले होते. विजयी उमेदवार मतमोजणी कक्षाबाहेर येताच समर्थकांकडून जल्लोष केला जात होता. भाजपाच्या वतीने भालोद, डांभुर्णी , सौखेडासीम, नायगाव, आडगाव, टाकरखेडा,
सांगवी बु.॥, निमगाव, वनोली, सातोद, मनवेल, वड्री यासह 20 गावातील 222 सदस्य
निवडून आल्याचा दावा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे व सरचिटणीस विलास चौधरी
यांनी केला आहे.


20 गावांमध्ये काँग्रेसची सत्ता
तलुक्यातील कोळवद, अट्रावल, मारुळ, किनगाव, वढोदे प्र. यावल, नावरे, पिळोदा, अंजाळे, बामनोद, दहिगाव, हिंगोणा, महेलखेडी यासह 18 ते 20 गावामध्ये काँग्रेसच सत्ता येईल, असा दावा काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे व शहर अध्यक्ष कदिरखान यांनी केला आहे. चिंचोली, राजोरे ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्याचे चोपडा
विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल साठे व अनिल साळुंके यांनी सांगितले.

ईश्‍वरचिठ्ठीने निवड
डांभूर्णी येथे दोन उमेदवारांना समान मत मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात माधुरी शरद बाविस्कर आणि सपकाळे रवींद्र मंगल यांना 277 अशी समान मते मिळाल्याने ईश्‍वरचिठ्ठीत माधुरी शरद बाविस्कर या विजयी झाल्या. वड्री येथील प्रभाग क्रमांक तीनमधील अनुसूचित जमाती महिलांसाठी झालेल्या निवडणुकीत तडवी फिजा फकीरा आणि तडवी सायरा सिराज यांना प्रत्येकी 229 मते मिळाल्यानंतर ईश्‍वरचिठ्ठीत फिजा फकिरा तडवी विजयी ठरल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !