राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांना धक्का : पुतण्यासह पॅनलचा दारुण पराभव


बोदवड : तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाल्यानंतर सोमवारी आलेल्या निकालात अनेक ठिकाणी दिग्गजांना फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रस्थापीतांचा पराभव करत अनेक नवखे उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. रवींद्र पाटील यांचा पुतण्या सम्राट पाटील यांच्यासह संपूर्ण पॅनलचा निवडणुकीत पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात त्याची दिवसभर चर्चा राहिली.

मनुर बु.॥ मध्ये अ‍ॅड.पाटील यांच्या पॅनलचा पराभव
जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचे केंद्रबिंदू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील यांचे मूळ गाव असलेल्या मनुर बु.॥ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांचे पुतणे सम्राट पाटील यांच्यासह पॅनलचा एक जागा वगळता दारुण पराभव झाला. माजी सरपंच पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल निवडणूक रींगणात होते. सम्राट पाटील यांचा 126 मतांनी दारुण प्रभाव झाला. एकूण 11 जगासाठी या ठिकाणी निवडणूक घेण्यात आली. माजी मंत्री एकनाथराव खडसे याचा राष्ट्रवादी प्रवेशामुळे स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होईल, असे वाटत असतानाच अ‍ॅड.रवींद्र पाटील यांना त्याच्या गावांत पराभवास सामोरे जावे लागले.



तालुक्यात अनेक दिग्गजांचा प्रभाव
ग्रामपंचायत निवडणुकीत नाडगाव येथे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे भाचे तथा पंचायत समितीचे माजी सदस्य विरेंद्रसिंग पाटील यांच्या पत्नी रंजनकौर पाटील या ईश्‍वर चिठ्ठीत पराभूत झाल्या. वाकी येथे पंचायत समिती सदस्य गणेश पाटील यांच्या आई विमलबाई पाटील या पॅनल पराभूत झाल्या. मनूर खुर्द येथे माजी सरपंच ईश्‍वर जंगले यांच्या पत्नी प्रमिला जंगले यांच्यासह पॅनल, साळसिंगी येथे पंचायत समितीचे माजी सभापती राजधर बिजगरे हे स्वतः पराभूत झाले तर त्यांचे पॅनलदेखील पराभूत झाले आहे. यासह आदर्श गाव मानमोडी येथील 15 वर्ष सरपंचपद भूषविलेले सतीश पाटील व त्याच्या पॅनलचाही दारुण पराभव झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !