सावदा पालिकेसाठी उद्या सभापती निवड


सावदा : सावदा पालिकेची नुकतीच विषय समित्याची निवड झाली होती त्यानंतर आता विषय समिती सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सदर सभापती निवड बुधवार, 20 रोजी होत आहे. येत्या वर्षातच पालिकेची सर्वत्रिक निवडणूक असून नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे म्हणूनच या सभापती निवडीस महत्व प्राप्त झाले आहे. सर्व विषय समित्यावर जरी सत्ताधारी गटाचे वर्चस्व असले तरी विरोधी गटातील सदस्यदेखील आहे व यावेळी निवडणुकीच्या तोंडावर आपणच सभापती हवे, अशी महत्वाकांक्षा अनेकांची असल्याने यासाठीच आता फील्डिंग लावण्याचे काम सुरू आहे.

उद्या ऑनलाईन सभा
सभापती निवडीसाठी बुधवार, 20 रोजी दुपारी 12 वाजता पालिकेची ऑनलाइन सभा होत आहे. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार मुक्ताईनगर असतील. सभा ऑनलाईन असली तरी नामनिर्देशन सकाळी 10 ते 12 या वेळेत ऑफलाईन पद्धतीने मुख्याधिकारी कक्षात स्विकारण्यात येणार आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !